
दापोली तालुक्यांतील आडे येथे विजेचा धक्का लागून वायरमन जखमी.
दापोली तालुक्यांतील आडे येथे वीज खांबावर काम करताना विजेचा धक्का लागून वायरमन रोहित आग्रे जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आडे येथील एका घराच्या वीजवाहिनीला कार्बन पकडले असल्याची तक्रार आली होती. त्यानुसार आग्रे वीज खांबावर दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी आग्रे यांच्या केसांचा मुख्य वाहिनीला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यात ते वीज खांबावर वापरल्या जाणार्या लाकडी झुल्यावर बेशुद्ध अवस्थेत अडकून राहिले. त्यानंतर त्यांना सुरक्षित खाली उतरवून उपजिल्हा ग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. या बाबतचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल राजू मोहिते करीत आहेत.www.konkantoday.com