
जिल्हा परिषद श्रेणी २ पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी १ मध्ये होणार रूपांतरित.
जिल्हा परिषद पशू संवर्धन विभागाचे तालुकास्तरावर सहा पशू चिकित्सालये आणि ग्रामीण भागात ६७ दवाखाने आहेत. आता या विभागातील श्रेणी २ मधील पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी १ मध्ये आणले जाणार आहेत. शासनाच्या नव्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पशुधन उपचारांसाठीची वैद्यकीय अधिकार्यांची उणीव दूर होण्यास मदत होणार आहे.जिल्हापरिषदेअंतर्गत असलेले ६७ दवाखाने श्रेणी २ मधून १ मध्ये वर्ग होणार असल्याने त्या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षकांऐवजी पशुधन विकास अधिकारी हे पद निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे पशुधन विकास अधिकार्यांच्या रिक्त पदांची संख्या वाढणार आहे.www.konkantoday.com