
चिपळूण कळंबस्ते येथे उभ्या राहणार्या देवराईच्या माध्यमातून १४९ प्रजातीची लागवड.
चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे साडेतीन एकरात उभ्या राहत असलेल्या देवराईत तब्बल १४९ प्रजातींच्या १२५४ रोपांची लागवड केली जात आहे. लागवड केलेल्या या रोपांचे बोटॅनिकल नाव, कॉमन नाव तसेच विकिपिडीयाशी लिंक साधणारा क्यूआर कोड दिला जणार असल्याने एक बोटॅनिकल लॅब उभी राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांनी दिली.जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील कळंबस्ते येथे पशुसर्ंधन विभागाच्या पडिक साडेतीन एकरात गुरूवारी देवराई वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी लिंगाडे बोलत होते.यावेळी ते पुढे म्हणाले, अत्याधुनिक कार्बन उत्सर्जनामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. त्यातून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, पुर, चक्रीवादळ इत्यादी स्वरूपातील वातावरणीय बदल होत आहेत. याचा ग्रामीण भागावर गंभीर परिणाम होत असून या पर्यावरणाच्या संकटाला तोंड देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाद्वारे वातावरणातील कार्बन वायू शोषून घेणे आवश्यक आहे. यासाठी जैवविविधतेचे जतन करण्यासाठी देवराया तयार करणे हा प्रभावी उपाय आहे. याच अनुषंगाने या देवराईची उभारणी करण्यात येत असून यासाठी सर्वांचा हातभार महत्वाचा आहे.www.konkantoday.com