
चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात संरक्षण भिंत कोसळली, रेलिंगही निखळलं
चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात शनिवारी पहाटेच संरक्षक भिंत कोसळल्याने रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे.कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात अचानक संरक्षक भिंत कोसळली असून रेलिंगही निखळलीय.घाटात खोल दरीच्या बाजूने असलेली ही भिंत कोसळली. यामुळे त्या ठिकाणी रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. एवढंच नाही तर या भागातील लोखंडी रेलिंगही तुटलं असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
घटनास्थळी प्रशासनाकडून सध्या फक्त दगड लावून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या उपाययोजना अपुऱ्या असून कोणताही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही