मुंबई-मडगाव एकेरी स्पेशल १४ जून रोजी धावणार.

कोकण मार्गावर धावणार्‍या रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी सीएसएमटी मुंबई-मडगांव एकेरी स्पेशल १४ जून रोजी चालवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने गुरूवारी सासंकाळी जाहीर केले.०११७१ क्रमांकाची सीएसएमटी-मडगांव एकेरी स्पेशल १४ जून रोजी सकाळी ७.३५ वाजता सीएसएमटी स्थानकातून सुटून त्याचदिवशी रात्री १०.३० वाजता मडगांव येेथे पोहोचेल. १६ एलएचबी डब्यांची स्पेशल दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्‍वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी आदी स्थानकात थांबेल.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button