नाटे-राजापूर येथे कलमाच्या खड्ड्यात पडून वृद्ध महिलेचा मृत्यू.

नाटे (ता. राजापूर) पडवणेवाडी येथील बेपत्ता झालेली वृद्ध महिला पडवणेवाडी-मुरकुंडा या ठिकाणी कलमाच्या खड्ड्यात मयत स्थितीत आढळली. शशिकला कृष्णा आंबोळकर, (८९, रा. नाटे, पडवणेवाडी, ता. राजापूर) असे वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास नाटे पडवणेवाडी येथील मुरकुंडा येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध शशिकला या दि. १ जूनला सकाळी साडेनऊच्या सुमारास घरातून निघून गेल्या होत्या. त्या परत आल्या नाही म्हणून नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली, मात्र, त्या सापडल्या नाहीत, या प्रकरणी नातेवाईकांनी नाटे पोलीस ठाण्यात खबर दिली होती.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button