चिपळूण नगर पालिकेची इमारत पाडण्यासाठी प्रतिसाद नाही, अवघी एकच निविदा.

चिपळूण येथील नगर पालिकेची एक इमारत मोडकळीस आली असून ती धोकादायक बनली आहे. यापूर्वीच या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी प्रशासनाला दिले होते. नगर पालिका प्रशासनानेही मुख्य इमारतीच्या मागील भाग धोकादायक बनला असल्याचा फलक उभारला होत्या. त्यानंतर आता ही इमारत तोडण्यासाठी निविदा प्रक्रिया तिसर्‍यांदा राबविण्यात आली. मात्र त्यालाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. या कामासाठी एकच निविदा आली आहे. येत्या दोन दिवसात ही निविदा उघडून पुढील प्रक्रिया प्रशासनाकडून तातडीने केली जाणार आहे.चिपळूण नगर पालिकेची इमारत ब्रिटीशकालीन आहे. नगर पालिकेच्या दोन्ही इमारतीही आता जुन्या झाल्या आहेत. या इमारतीच्या दुरवस्थेला अनेक कारणे असून ज्या इमारतीमधून शहर विकासासाठी दरवर्षी करोडो रुपयांचा निधी दिला जातो. त्याच इमारतीच्या देखभाल दुरूस्तीकडे सुरूवातीपासून दुर्लक्ष झाले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button