लांजा येथील युवक कौस्तुभ कुरूप मृत्यु प्रकरणी राजापूर पोलीसांकडून अपघाती मृत्यु म्हणून गुन्हा नोंद


लांजा येथील कौस्तुभ विजय कुरूप (वय ३०) याच्या मृत्यु प्रकरणी राजापूर पोलीसांनी अपघाती मृत्यु अशी नोंद केली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.लांजा पोलीस स्थानकात मंगळवारी नापत्ता म्हणून तक्रार व नोंद असलेल्या कौस्तुभ विजय कुरूप (वय ३०) रा. लांजा याचा इरटीका कारसह मृतदेह बुधवारी अणूस्कुरा घाटात खोल दरीत आढळून आला होता. कौस्तुभ हा चालवत असलेली इरटीका कार व त्याचा मृतदेह घाटात आढळून आल्याने हा अपघात, घातपात की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे.

दरम्यान कौस्तुभ याचा मृतदेह बुधवारी सायंकाळी शवविच्छेदन करून त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून शोकाकुल वातावरणात त्याच्यावर लांजा येथे बुधवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान या मृत्यु प्रकरणी प्राथमिक दर्शनी अपघात असल्याचे दिसून येत असल्याने राजापूर पोलीसांनी अपघात प्रकरणी गुन्हा नोंद करत अपघाती मृत्यु अशी नोंद केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button