दोन तास आमच्याकडे इडी, सीबीआय आणि पोलिस आले तर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पासून भाजप हा 90% आउटगोइंग करेल- संजय राऊत


शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला सांगलीमध्ये मोठा धक्का मानला जात आहे.तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना हे कोणत्याही प्रकारचं दाबाव आणि ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. पक्षात राहून पक्षाविरुद्ध कार्यवाही कराल तर तुमच्यावर कार्यवाही होईल. अशी रोखठोक भूमिका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी चंद्रहार पाटलांवरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, पैशाच्या ताकदीवर लोक विकत घेणं, तपास यंत्रणांचा गैरवापर करून एखाद्याला दुसऱ्या पक्षात जाण्यास भाग पाडणे याला आउटगोइंग इनकमिंग अशा उपमा देऊ नका. दोन तास आमच्याकडे इडी, सीबीआय आणि पोलिस आले तर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पासून भाजप हा 90% आउटगोइंग करेल असं माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button