
ठाकरे शिवसेनेचे नवनिर्वाचित उपनेते बाळासाहेब माने यांना शुभेच्छा
माजी आमदार सुरेंद्रनाथ उर्फ बाळासाहेब माने यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. याबद्दल शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या शहरातील अभ्युदय नगर येथील संपर्क कार्यालयात श्री. माने यांचे पेढा भरवून आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख (दक्षिण) दत्तात्रय कदम, जिल्हाप्रमुख (उत्तर) बाळा खेडेकर, शिवसहकार सेना रत्नागिरी जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे, शिवसहकार सेना जिल्हा समन्वयक परवेश घारे, विधानसभा क्षेत्र संघटक रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, कमलाकर कदम, सुरेश करंबेळे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, युवासेना उपजिल्हा अधिकारी संतोष हातणकर, विभाग प्रमुख किरण तोडणकर, बाबू मोरे, विभाग संघटक प्रवीण साळवी, उपविभाग प्रमुख बाळू हर्याण, राजेंद्र सुर्वे, शिवसहकार सेनेचे सर्व पदाधिकारी, उमेदवार उपस्थित होते.