चोरांचा सुळसुळाट वाढल्याने लवकरच ११८ सीसीटीव्ही कॅमेरेची चिपळूण शहरावर नजर


अलिकडच्या काही वर्षात चिपळूण शहर व परिसरात घरफोड्यांसह चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या प्रकारांना आळा बसावा आणि चोरट्यांचा शोध लागावा, या पार्श्‍वभूमीवर नगर परिषदेने यापूर्वी काही भागात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. मात्र ही यंत्रणा अपुरी पडत असल्याने नुकत्याच घडलेल्या शहरातील १३ घरफोड्यांच्या घटनांमधून स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार येथील पोलीस यंत्रणेमार्फत शहरातील विविध भागात आणखी ८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. याबाबतची कार्यवाही सुरु झाली आहे. यामुळे लवकरच ११८ सीसीटीव्ही कॅमेरे चिपळूण शहरावर नजर ठेवून असणार आहेत.
कोकणातील मध्यवर्ती असणारे चिपळूण शहर झपाट्याने विकसित होत आहे. मोठमोठ्या इमारती, बंगले, अपार्टमेंटचे जाळे विणले जात आहे. लोकवस्ती वाढली आहे. शिवाय तालुक्याची बाजारपेठ येथे आहे. गेल्या काही वर्षात शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button