
संगमेश्वर तालुक्यातील भिरकोंड येथील अल्पवयीन युवती बेपत्ता.
संगमेश्वर तालुक्यातील भिरकोंड येथील आजोळी राहणारी अल्पवयीन विद्यार्थीनी महाविद्यालयात जाते, असे सांगून घरातून निघून गेली. मात्र ती संध्याकाळी उशिरापर्यंत घरी परत आलीच नाही. त्यामुळे धास्तावलेल्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेवूनही तिचा कोठेच तपास न लागल्याने अखेर संगमेश्वर पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल मुलींच्या घरच्यांनी केली आहे.www.konkantoday.com