प्रीती झिंटाच्या या कृतीचंही नेटिझन्सकडून कौतुक


मंगळवारी रात्री आरसीबीनं आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव करून विजेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरलं. बंगळुरूनं तब्बल १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकल्यामुळे सोशल मीडियापासून सर्वत्र आरसीबीचा विजय आणि विराट कोहलीचे अश्रू अनावर झालेले व्हिडीओ याचीच चर्चा पाहायला मिळत आहे.मात्र, एकीकडे सगळेच आरसीबीच्या जेतेपदाची चर्चा करत असताना दुसरीकडे नेटिझन्सनं पराभवानंतर डोळ्यांत वेदना घेऊन भावनांना आवर घालत फिरणाऱ्या प्रीती झिंटाचीही आठवण करून दिली आहे.

आरसीबी व विराट कोहलीनं पहिल्यांदाच विजेतेपद पटकावल्यामुळे बंगळुरूला मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळताना पाहायला मिळालं. पण PBKS संघदेखील गेल्या १८ पर्वांमध्ये एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. त्यामुळे आरसीबीप्रमाणेच पंजाब संघही आयपीएल ट्रॉफीची तितक्याच आतुरतेनं प्रतीक्षा करत होता. मात्र, शेवटच्या सामन्यात आरसीबीनं सरस खेळ करत पंजाबला नमवलं आणि आयपीएलचं जेतेपद आपल्या नावावर केलं.

प्रीती झिंटाचे फोटो व्हायरल!

विजयानंतर मैदानावरच ओक्साबोक्शी रडणाऱ्या विराट कोहलीचे फोटो जसे व्हायरल होत आहेत, तसेच प्रयत्नपूर्वक आपल्या भावना आवरून धरत मैदानावर आपल्या संघाच्या अर्थात पंजाब किंग्जच्या खेळाडूंना धीर देतानाचे प्रीती झिंटाचेही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये प्रीती झिंटा पंजाबी ड्रेसमध्ये दिसत आहे. सामना संपल्यानंतर प्रीती झिंटा मैदानावर आली आणि तिनं कर्णधार श्रेयस अय्यरसह पंजाबच्या सर्वच खेळाडूंना धीर दिला. प्रीती झिंटाच्या या कृतीचंही नेटिझन्सकडून कौतुक केलं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button