
गुहागरमधील पोर्ट अधिकार्याची ऑनलाईन फसवणूक
गुहागर : अंजनवेल येथील कोकण एलएनजी पोर्ट मॅनेजर असलेल्या अधिकार्याच्या बँक खात्यातून अज्ञाताने ऑनलाईन 76 हजार 734 रुपयांची फसवणूक केल्याची घटना 15 रोजी घडली. या प्रकरणी गुहागर पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहितीनुसार गॅस आणि विद्युत प्रकल्पातील कोकण एलएनजी पोर्ट मॅनेजर दिलीप कुमार रामजन्म सिंह (वय 41), सध्या रा. अंजनेवल ब्राह्मणवाडी येथे आपल्या कुटुंबासह राहतात. ते मार्च 2021 पासून नोकरीत आहेत. त्यांचे अॅक्सिस बँक, साक्ची जि. जमशेदपूर, राज्य झारखंड येथे सुमारे 2012 पासून एन.आर.आय. बचत खाते आहे. त्यातून 76,734/- रूपये हे डेबीट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी गुहागर पोलिस अधिक तपास करत आहेत.