कार, SUV सारखी प्रवासी वाहने थेट रेल्वेच्या वॅगनवर घेऊन जाण्याचा रो रो सर्विस चा प्रयोग कोकण रेल्वे गणपतीतून सुरू करण्याच्या विचारात


यंदाच्या गणेशोत्सवात कोकणातील रस्त्यांवरील गर्दीपासून सुटका हवी आहे का? तुमचं स्वतःचं वाहन घेऊन प्रवास करायचा आहे का? तर कोकण रेल्वे एक अभिनव सुविधा आणण्याच्या तयारीत आहे.

कार, SUV सारखी प्रवासी वाहने थेट रेल्वेच्या वॅगनवर घेऊन जाण्याचा प्रयोग कोकण रेल्वे गणपतीतून सुरू करण्याचा विचार करीत आहे.

कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “ही कल्पना खूपच छान आहे आणि आम्ही नक्कीच याचा विचार करणार आहोत. ट्रकसाठी ‘रो-ऑन रो-ऑफ’ सेवा यशस्वी ठरली आहे, त्याच धर्तीवर खास प्रवाशांसाठी त्यांच्या कार किंवा SUV रेल्वे वॅगनवर घेऊन जाणे शक्य आहे. यासाठी काही तांत्रिक बाबी सुधारण्याची गरज आहे, पण हा प्रयोग गणपतीमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

काय आहे Ro-Ro सेवा? ‘रो-ऑन रो-ऑफ (Ro-Ro)’ ही सेवा कोकण रेल्वेने यापूर्वी ट्रकसाठी सुरू केली होती. या सेवेअंतर्गत ट्रक थेट विशेष प्रकारच्या रेल्वे वॅगनवर चढवले जातात.

या सेवेच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी, सेवा कोलाड ते मंगळूर दरम्यान कार्यरत

ट्रक एका रॅम्पवरून वॅगनवर चढवले जातात
ट्रकची उंची ३.४२५ मीटरपेक्षा कमी असणे बंधनकारक
चालक व क्लीनर ट्रकमध्येच प्रवास करतात, त्यांना तिकीट घ्यावे लागते
किमान ४० ट्रक झाल्याशिवाय गाडी चालवली जात नाही
कार आणि SUV साठी विशेष तयारीची गरज

प्रवासी वाहनांकरिता Ro-Ro सेवा देण्यासाठी, ट्रकसाठी असलेल्या वॅगनच्या तुलनेत काही बदल करावे लागतील.
कार्स आणि SUV साठी नवीन डिझाइन केलेल्या वॅगन्स लागतील
गाड्यांची चढउतार सुलभ होईल, अशी रॅम्प व्यवस्था आवश्यक
कार मालकांनी आपली वाहने कोलाड स्थानकापर्यंत आणावी लागतील
गाडी चालवण्यासाठी किंवा गाडीत बसूनच प्रवास करता येईल की नाही, यावर निर्णय प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button