
कोमसापच्यावतीने शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी यांचा खास गौरव.
रत्नागिरी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित सन्मान सोहोळ्यात रत्नागिरीतील प्रसिद्ध शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कोमसापचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ आणि ज्येष्ठ विचारवंत उदय निरगुडकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून कांबळी यांना गौरविण्यात आले. www.konkantoday.com