सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावरील ओरोस हूमरमळा येथे रस्त्याच्या खड्ड्यामुळे दुचाकीला अपघात, महिलेचा मृत्यू


सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावरील ओरोस हूमरमळा येथील राणे स्टॉप जवळ मोटार सायकलवरील चालकाचा खड्ड्यांमुळे ताबा सुटून झालेल्या अपघातात.रानबांबुळी येथील २८ वर्षीय युवती सेलीना जॉन फर्नांडिस हिचा मृत्यू झाला तर मोटार सायकल स्वार जोसेफ अंतोन फर्नांडिस, वय-33 वर्ष, राहणार – नेरुर, ता.कुडाळ हा जखमी झाला आहे.हा अपघात दिनांक 01/06/2025 रोजी 07:55 ते 08:00 वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा हायवे , हुमरमळा राणेवाडी, ता-कुडाळ येथे झाला.या बाबतची फिर्याद जॉन्सन जॉन फर्नांडिस, वय 26 रा-जैतापकर कॉलनी ,गणेश नगर ,रानबांबुळी ता. कुडाळ याने दिली असून,सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी जोसेफ फर्नांडिस याच्यावर रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वेगात गाडी चालवीत गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन सदर अपघातात स्वतःच्या व मोटर सायकलच्या पाठीमागे बसलेल्या तक्रारदार यांची बहीण सेलेना जॉन फर्नांडिस हिस गंभीर दुखापती होऊन ती उपचारादरम्याने मयत झाली असल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी जोसेफ अंतोन फर्नांडिस याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 01/06/2025 रोजी रात्रौ 08.00 वाजताच्या सुमारास जोसेफ अंतोन फर्नांडिस हा आपल्या ताब्यातील पल्सर मोटरसायकल क्रमांक MH-07-AP-8658 ही ओरोस ते कुडाळ अशी घेऊन चालला होता .त्याच्या मागे मोटार सायकल वर सेलीना जॉन फर्नांडिस ,वय -28 वर्ष ,राहणार – -जैतापकर कॉलनी ,गणेश नगर ,रानबांबुळी ता. कुडाळ ही बसली होती. रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वेगात गाडी चालवीत निघून जात असताना हुमरमळा राणेवाडी येथील मुंबई गोवा महामार्गावर आला असता त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन दोघेही रस्त्यावर कोसळली.यात सेलिना हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.तिला लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मावळली.तर मोटरसायकल स्वार जोसेफ फर्नांडिस हा जखमी झाला आहे.

दरम्यान स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा अपघात झाला त्या ठिकाणी महामार्गावर खड्डे आहेत.या खड्ड्यांमध्ये ही गाडी गेल्याने चालकाचा ताबा सुटला आणि मोटार सायकल रस्त्यावर पडली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button