संत श्री गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरला मार्गस्थ होणार! जाणून घ्या कसा राहणार प्रवास ?

बुलढाणा, विदर्भची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आज सकाळी ७ वाजता आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्याकरिता पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.यंदा पालखीचे हे ५६ वे वर्षे आहे.

श्रींच्या पालखीचा पंढरपूर पायदळ प्रवास दिनांक २ जून २०२५ रोजी श्री क्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थानमध्ये महाप्रसादानंतर सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे रात्रीच्या मुक्कामी राहील.

असा असणार पालखीचा प्रवास.

३ जुन २०२५ रोजी पारस येथून गायगाव येथे, तर रात्री भौरद येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील. त्यानंतर अकोला येथे

४ व ५ जुन २०२५ असे दोन दिवस मुक्काम राहील.

६ जुन २०२५ रोजी सकाळी भरतपूर-वाडेगाव,

७ जुन २०२५ रोजी देऊळगाव (बाभूळगाव) पातूर,

८ जुन २०२५ मेडशी श्री क्षेत्र डव्हा,

९ जुन२०२५ मालेगाव शिरपूर जैन,१० जुन २०२५ चिंचापा पेन-म्हसला पेन,

११ जुन २०२५ किनखेडा-रिसोड,

१२ जून २०२५ नपानकन्हेरगाव-सेनगाव,

१३ जुन २०२५ श्री क्षेत्र नरसी (नामदेव) डिग्रस,

१४ जून २०२५ श्री क्षेत्र औंढा नागनाथ जवळा बाजार येथे मुक्काम राहील.

१५ जून २०२५ हट्टा (अडगांव रंजोबा) श्री क्षेत्र त्रिधारा,

१६ जून २०२५ परभणी परभणी,

१७ जून २०२५ ब्राह्मणगाव दैठणा,

१८ जुन २०२५ खळी गंगाखेड,

१९ जुन २०२५ वडगाव (दादा हरी) परळी (थर्मल),

२० जून २०२५ परळी परळी वैजनाथ,

२१ जून २०२५ कन्हेरवाडी अंबाजोगाई,

२२ जून २०२५ लोखंडी सावरगाव बोरी/सावरगाव,

२३ जून २०२५ गोटेगाब कळंब,

२४ जून २०२५ गोविंदपूर तेरणा सा. कारखाना,

२५ जून २०२५ किनी उपळा (माकडाचे),

२६ जून २०२५ श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर (धाराशिव) धाराशिव,

२७ जून २०२५ बडगाब सिद्धेश्वर श्री क्षेत्र तुळजापूर,

२८ जून २०२५सांगवी, ऊळे,

२९ जून २०२५ सोलापूर, सोलापूर,

३० जुलै २०२५ सोलापूर असा राहिल प्रवास.

१ जुलै २०२५ सोलापूर, तिन्हे,

२ जुलै २०२५ कामती खु. (वाघोली) माचनूर,

३ जुलै २०२५ ब्रह्मपुरी, श्री क्षेत्र मंगळवेढा,

४ जुलै २०२८ श्री क्षेत्र मंगळवेढा व रात्री श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रींची पालखी पोहचणार आहे.

त्यानंतर, दि.४ जुलै २०२५ ते दि.९ जुलै २०२५ पर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रींच्या पालखीचा मुकाम राहील.

दि. १० जुलै २०२५ रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथुन श्रींचा पालखी सोहळा निघून दि.३१ जुलै २०२५ वार गुरुवार रोजी संत नगरी शेगांव येथे दाखल होणार आहे.

७०० वारकरी २५० पताकाधारी २५० टाळकरी आणि २०० सेवाधारी,२५० पताकाधारी २५० टाळकरी आणि २०० सेवाधारी सहभागी होणार आहेत.श्री संत गजानन महाराजांची पालखी अंदाजे ३३ दिवसांत ७०० किलोमिटरचे अंतर पायी चालत ४ जुलै २०२५ रोजी पंढरपुरात दाखल होईल.

६ जुलै २०२५ रोजी पंढरपूरच्या आषाढी एकादशीमध्ये सहभागी होत परिक्रमेमध्ये देखील सहभाग घेणार आहे. पालखीच्या परतीचा प्रवास हा १० जुलै २०२५ रोजी सुरू होत,३१ जुलै रोजी शेगाव येथे आगमन होणार आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक शेगावात दाखल उद्या २ मे २०२५ सकाळी श्रींची पालखी निघण्यापूर्वी टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय कार्यक्रम पार पडतात आणि त्यानंतर सुरू होतो मंदिरातून मार्गस्थ होण्याचा प्रवास.यावेळेस स्थानिक भाविक देखील काही पावले चालत श्रींच्या या पालखीत आपला सहभाग नोंदवतात. या पालखीला व श्रींचे दर्शन घेण्याकरिता राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक शेगावात दाखल होत असतात. व पंढरपूरचा प्रवास सुरू होण्यापूर्वी श्रींच्या पालखीचे दर्शन घेतात.एक आगळा वेगळा अनुभव हा पालखी मार्गस्थ होताना देखील अनुभवाला मिळतो.

श्रींच्या पालखीचे विशेष महत्त्वपंढरपुरात देखील विदर्भातील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या शिस्त, स्वच्छता आणि वारकऱ्यांबद्दल एक विशेष स्थान आहे. विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या या पालखीचे पंढरपुरात देखील जल्लोषात व उत्साहात आगमन होताच स्वागत केले जाते.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button