
राजापूरची पूररेषा, देवस्थान इनाम आणि गावठाण जमिनीचा प्रश्न साेडविण्यासाठी कटीबद्ध -माजी आमदार हुस्नबानू खलिेपे
राजापूर पूररेषेचा प्रश्न आणि देवस्थान इनाम व गावठाण जागेचा प्रश्न साेडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहाेत, असे अभिवचन राजापूरच्या माजी नगराध्यक्षा व आघाडीच्या उमेदवार हुस्नबानू खलिे यांनी दिली.
राजापूरच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आघाडीर्ते खलिेने निवडणूक लढवीत आहेत. आमदार म्हणून यशस्वी कारकीर्द पूर्ण केलेली असताना नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यामागचे कारण काय? या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, मी नगरसेविका आणि नगराध्यक्षा म्हणून प्रभावीपणे केलेले काम जनता विसरलेली नाही. स्वच्छ कारभार आणि गतिमान प्रशासनामुळे विकास कामांबराेबरच जनतेच्या प्रश्नांचा न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यामुळे यावेळी महिला सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यावर अनेकांनी मला निवडणूक रिंगणात उतरण्याचा आग्रह केला, शिवाय पक्षाने मला आदेश दिला आहे. त्यामुळे जनाधार आणि पक्षादेश शिराेधार्थ मानून निवडणुकीत उतरले आहे.www.konkantoday.com




