
सुनेचा विनयभंग करणार्या सासर्याला गावातून हद्दपार करा, झोंबडी ग्रामपंचायतीचा ठराव.
गुहागर तालुक्यामधील झोंबडी गावामध्ये दारू विक्रीचा व्यवसाय करणार्या सासर्याने नवविवाहीत सुनेवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक झालेल्या विजय शांताराम सकपाळ याला गावातून हद्दपार करण्यात यावी, असा एकमुखी ठराव झोंबडी ग्रामपंचायतीच्या आज पार पडलेल्या ग्रामसभेत करण्यात आला. सरपंच अतुल लांजेकर यांनी याबाबत घेतलेल्या पुढाकारचे सर्वांनी कौतुक केले आहे. तसेच यापुढे गावात अशाप्रकारचे कृत्य कोणी केल्यास तशाच प्रकारे कारवाई केली जाणार आहे. झोंबडी येथील विजय शांताराम सकपाळ या साठ वर्षीय इसमाने आपल्याच २१ वर्षीय सुनेचा सातत्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. सुनेने त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून गुहागर पोलीस स्थानकात २५ रोजी सासरच्या विरोधात गुन्हा दाखल केला.www.konkantoday.com