
मा.ना.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी तालुका भाजपा च्या वतीने महिला वृद्धाश्रमाला वस्तुरूपी मदत..
भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्क मंत्री व महाराष्ट्र राज्याचे मत्स्य विकास मंत्री मा.ना नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी तालुका दक्षिण, तालुका उत्तर व तालुका मध्य अशा तिन्ही मंडलाचा एकत्रित कार्यक्रम म्हणून पावस येथील अनुसया महिला वृद्धाश्रम येथे बेडसीट फळे व लाडू वाटपाचा कार्यक्रम आज करण्यात आला..

या वेळी वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापक देसाई मॅडम व फडके मॅडम यांनी वृद्धाश्रमाच्या कार्या विषयी माहिती दिली. यावेळी भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष नाना शिंदे, तालुका अध्यक्ष दक्षिण दादा दळी, तालुका अध्यक्ष उत्तर विवेक सुर्वे, मध्य तालुका अध्यक्ष प्रतिक देसाई, सरचिटणीस सुशांत पाटकर, सरचिटणीस उमेश देसाई, उपाध्यक्ष राजेश पाथरे, महिला आघाडीच्या दिक्षा गझने, प्रज्ञा शिवगण,अपूर्वा जोशी, अजय पानगले संतोष सुर्वे, प्रकाश पवार, प्रवीण पाथरे, आशिष भाटकर, जगन्नाथ पवार, संतोष रेघे, गुरूदास गोविलकर, संदीप पवार, ऋग्वेद दळी, प्रज्योत गुळेकर, संदीप प्रसाद पवार , कृष्णा नैकर, माधव पोतकर, विजय निकम,अविनाश वरवडकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.




