
पुण्यातल्या मावळमध्ये मोठी दुर्घटना, कुंडमळ्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला , दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू
पुण्यातल्या मावळमध्ये मोठी दुर्घटना घडली. कुंडमळ्यातील इंद्रायणी नदीवर असणारा पूल कोसळला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर २० ते २५ पर्यटक वाहून गेल्याचे सांगितले जात आहे.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. हा पूल नेमका कसा कोसळला याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या मावळमध्ये कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी आले होते. कुंडमळ्यात अलिकडून पलिकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर केला जोता. या पूलावर एकाच वेळी जास्त पर्यटक आल्याने आणि पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्याने ओव्हरवेट होऊ पूल कोसळल्याची माहिती समोर आली आहे.




