
अखेर मुंबईसाठी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर, कुठल्या वर्गाला मिळणार महापौरपद?
मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी आज आरक्षण सोडत जाहीर होत आहे. मुंबईचं महापौरपद कुठल्या प्रवर्गाला मिळणार? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. अखेर आरक्षण सोडतीत खुल्या वर्गाला म्हणजे ओपन कॅटेगरीला मुंबईच महापौरपद मिळणार आहे.त्यामुळे भाजपचा महापौरपद बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अ.क्र. महानगरपालिकेचे नाव आरक्षित प्रवर्ग (Reservation Category)
1 बृहन्मुंबई (BMC) सर्वसाधारण
2 ठाणे अनुसूचित जाती (एससी)
3 कल्याण-डोंबिवली अनुसूचित जमाती- एसटी (पुरुष)
4 नवी मुंबई सर्वसाधारण
5 वसई-विरार सर्वसाधारण
6 भिवंडी-निजामपूर सर्वसाधारण- महिला
7 मीरा-भाईंदर सर्वसाधारण
8 उल्हासनगर ओबीसी- महिला किंवा पुरूष
9 पुणे सर्वसाधारण
10 पिंपरी-चिंचवड सर्वसाधारण- महिला
11 नागपूर सर्वसाधारण
12 अहिल्यानगर ओबीसी- महिला
13 नाशिक सर्वसाधारण
14 छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण
15 अकोला ओबीसी-महिला
16 अमरावती सर्वसाधारण
17 लातूर अनुसूचित जाती (एससी)- महिला
18 नांदेड-वाघाळा सर्वसाधारण
19 चंद्रपूर ओबीसी- महिला
20 धुळे सर्वसाधारण
21 जळगाव ओबीसी- महिला
22 मालेगाव सर्वसाधारण
23 कोल्हापूर ओबीसी-महिला किंवा पुरूष
24 सांगली-मिरज-कुपवाड सर्वसाधारण
25 सोलापूर सर्वसाधारण
26 इचलकरंजी ओबीसी- महिला किंवा पुरूष
27 जालना अनुसूचित जाती (एससी)- महिला
28 पनवेल ओबीसी- महिला किंवा पुरूष
29 परभणी सर्वसाधारण




