जगातील सर्वात उंच पूल, जम्मू काश्मीरसाठी गेम-चेंजर ठरणाऱ्या पुलाचे आज लोकार्पण


पंतप्रधान मोदी आज म्हणजेच 6 जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाचे उद्घाटन करणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील चिनाब रेल्वे आता प्रवाशांसाठी खुला होणार आहे. उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरने चिनाब ब्रिजजवळ बनवण्यात आलेल्या हेलीपॅडवर पोहोचणार आहेत आणि तिथून पुलाचे निरीक्षण करणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात SPG चे 300 कमांडो तैनात असणार आहेत. तर, सात ड्रोन आणि सॅटेलाइटने संपूर्ण परिसरावर नजर ठेवली जाणार आहे. उद्घाटनानंतर शुक्रवारी 6 जूनपासून कटरा ते संगलदानदरम्यान 63 किमी च्या रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा सुरू होणार आहे.

चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे. हा पूल पूर्ण होण्यासाठी तब्बल 22 वर्षे लागली. जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज म्हणून याकडे पाहिलं जातं. चिनाब पूल हा जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकचा एक भाग आहे. चिनाब पूलाची वैशिष्ट्यै काय आहेत जाणून घेऊयात.

चिनाब रेल्वे ब्रिज उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचाच एक भाग आहे. या पुलाच्या निर्माणासाठी 1486 कोटींचा खर्च अपेक्षित होता. हा पूल 266 किमी प्रति तास हवेच्या गतीचा सामना करु शकतो. तसंच, 8 रिश्टर स्केलपर्यंतचा भूकंपाचा धक्का सहन करण्याची क्षमता या पूलात आहे. या पूलामुळं श्रीनगर ते कटरापर्यंतचा प्रवास तीन तासांनी कमी होणार आहे. या ब्रिजवरील पहिली यशस्वी चाचणी जून 2024मध्ये झाली होती. त्यानंतर 2025मध्ये वंदे भारत ट्रेनची चाचणी घेण्यात आली होती. या पुलाचा पाया 2003मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी रचला होता. त्यानंतर या पुलाच्या कामासाठी 22 वर्ष लागले.

चिनाब पुलाची वैशिष्ट्यं

  • चिनाब पूल जगातील सर्वात उंच पूल
  • उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकचा एक भाग
  • चिनाब पूल बांधण्यासाठी तब्बल 22 वर्ष लागली
  • पुलाची उंची चिनाब नदीच्या तळापासून 1,178 फूट
    -आयफेल टॉवरपेक्षा चिनाब पूल उंच
    -कुतुबमिनारपेक्षा चिनाब पूल 5 पट जास्त उंच
    -भूकंप, जोरदार वा-याचा पुलावर कोणताही परिणाम नाही
  • पुलासाठी 30 हजार मेट्रिक टन स्टीलचा वापर
  • चिनाब पुलासाठी जवळपास 15 हजार कोटी रुपये खर्च

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button