
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मुख्य संशयित निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डरवर अटक, काही काळ कोकणातही वास्तव्य
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मुख्य संशयित निलेश चव्हाणला अटक करण्यात पिंपरी-चिंचवड पोलीस पोलिसांना यश आले आहे. निलेश चव्हाण हा काही दिवसांपासून फरार होता. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथकं तयार केली होती.पिंपरी-चिंचवड पोलिसांची ४ पथकं तर पुणे पोलिसांची ३ पथकं राज्यात आणि इतर राज्यांमध्येही शोध घेत होते.निलेश देशाबाहेर पलायन करू नये यासाठी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आला होता. आज पिंपरी-चिंचवड पोलिसांना निलेश अटक केलीय.अखेर बंदूकधारी निलेश चव्हाण पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात आला आहे. त्याला नेपाळ बॉर्डरवरून त्याला अटक करण्यात आलीय.
निलेश २१ मे पासून फरार होता. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर बावधन पोलिसांत गुन्हा दाखल आहे. निलेश महाराष्ट्रातून नेपाळ बॉर्डरपर्यंत कसा गेला याची माहिती हाती आलीय. निलेशने महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा राज्यातून नेपाळ बॉर्डर गाठल्याची माहिती समोर आलीय.वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाती संशयीत आरोपी निलेश चव्हाण हा करीश्मा आणि लता हगवणे यांचे फोन घेऊन पसार झाला होता असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे वैष्णवी हगवणे प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे निलेशकडे असल्याच पोलिसांनी सांगितलंय.
दरम्यान त्याने पुणे ते नेपाळ हा प्रवास कसा केला याची माहिती समोर आलीय. हाती आलेल्या माहितीनुसार, फरार आरोपी निलेश चव्हाण हा पिंपरी चिंचवडमधून महाबळेश्वरला गेला. त्याने तिथे काही काळ दिवस राहिला. त्यानंतर तो तेथून कोकणात गेला. पोलिसांना त्याच्या फोनचं लोकेशनही कोकणातील मिळालं होतं. यानंतर पोलिसांना त्याची कोणतीच माहिती मिळत नव्हती. त्यानंतर निलेश चव्हाण पुन्हा मुंबईत आला.मुंबईहून त्याने दिल्ली असा प्रवास केला. हा प्रवास त्याने ट्रेनने केल्याच सांगण्यात येत आहे. दिल्लीवरुन तो रोडने प्रवास करत नेपाळ बॉर्डरपर्यंत पोहोचला. त्याने सोनौली या नेपाळ सिमेवरील गावात मुक्काम केला. दिल्ली ते गोरखपूर असा त्याने ट्रॅव्हल्सने प्रवास केला. तो ज्या ट्रॅव्हल्स बसमधून त्याने प्रवास केला त्या बसचे सीसीटीव्ही फुटेश समोर आले आहेत.