
लांजा येथील बसस्थानकाच्या समोर एस टी बसचे चाक पायावरून गेल्याने वृद्ध गंभीर जखमी.
लांजा येथील बसस्थानकाच्या समोर एस टी बसचे चाक पायावरून गेल्याने वृध्दाचे दोन्ही पाय निकामी झाला या घटनेने परिसरात गर्दी जमली होती. नागरिकांनी बस रोखून धरली. ही घटना शनिवार 31 मे रोजी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.दुपारी एक वृध्द पादचारी रस्त्याच्या कडेने जात असताना बसची धडक बसली. या धडकेत पादचाऱ्याच्या पायावरून चाक गेल्याने दोन्ही पाय निकामी झाले आहेत. अपघाताची घटना घडताच नागरिकांची गर्दी जमली होती. जखमीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जमावाने रस्ता रोखून धरला. दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होताच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.