
लांजाजवळील कुवे माळवाडीत रानगव्याचा मुक्त संचार.
लांजा नगर पंचायत कार्यक्षेत्रातील कुवे माळवाडी घोडखिंड परिसरात गेल्या काही दिवसांपासून भल्या मोठ्या गव्याचा मुक्त संचार सुरू असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुवे गावातील माळवाडी घोडखिंड येथे बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास एक भला मोठा गवा मुक्त संचार करत असल्याचे दृश्य येथील काही तरुणांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपले. आडदांड शरीरयष्टी असलेला हा गवा भरवस्तीलगत मुक्त संचार करत असल्याने कुवे गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा गवा घोडखिंडमार्गे देव डोंगर येथे पुढे गेल्याचे तरुणांनी पाहिले असून याच मार्गावर पुढे वनगुळे-इंदवटी येथील लोकांची ये-जा असते. त्यामुळे गव्याच्या मुक्त संचाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.www.konkantoday.com