
मुंबई गोवा महामार्गावर २३ लाख ९४ हजार रुपयांचा गुटखा जप्त
चिपळूण ३१:- चिपळूण तालुक्यातील मुंबई- गोवा महामार्गावरील कापसाळ येथे गुरुवारी रात्री उशिरा गुटखा वाहतूक करणारी बोलेरो गाडीसह २३ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी पकडून ताब्यात घेतला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केल्या या कारवाईत तब्बल १६ लाख ९४ हजार रुपयांचा गुटखा तर ७ लाख रुपयांची बोलेरो पिकअप गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
गुरुवारी रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गुटख्याची गाडी चिपळुणात येत असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार वृषाल शेटकर, पोलीस हवालदार संदीप मानके, पोलीस नाईक रोशन पवार या पथकाने कापसाळ येथे सापळा रचत संशयास्पद बोलेरो पिकअप गाडी तपासणीसाठी थांबवण्यात आली.*