
मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेसला राजापूर रेल्वेस्थानकात थांबा देण्याची मागणी.
राजापूर तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर रोड हे कोकण रेल्वेमार्गावरील एक महत्वाचे स्थानक आहे. येथून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्या अनुषंगाने मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस व नेत्रावती एक्स्प्रेस या गाड्यांना या स्थानकावर थांबा चावा, अशी मागणी पंचक्रोशी ग्रामविकास समिती, राजापूर (मुंबई) खेच्यावतीने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी श्णवी यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. कोकण रेल्वे प्रकल्पाची उभारणी होताना कोकणवासियांचा मोलाचा सहभागं राहिला आहे. अनेक स्थानिक रहिवाशांनी आपली जमीन या प्रकल्पासाठी दिली आहे. परंतु आजवर कोकण रेल्वेचा प्रत्यक्ष लाभ कोकणातील नागरिकांना अपेक्षित प्रमाणात मिळताना दिसत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर रोड हे स्थानक कोकण रेल्वेमार्गावरील एक महत्वाचे स्थानक असून, येथून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.www.konkantoday.com