एक लाख विद्यार्थ्यांनी केली आयटीआयसाठी नोंदणी, पाच दिवसांत ३५ हजार १२८ विद्यार्थ्यांनी भरले पसंतीक्रम.

मुंबई :* आयटीआय ऑनलाईन प्रवेशाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, मागील १५ दिवसांमध्ये सुमारे ९९ हजार ४९४ विद्यार्थांनी अर्ज केले आहेत. यापैकी ८७ हजार ३१२ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपले अर्ज निश्चित केले आहेत. ३५ हजार १२८ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत.यंदा आयटीआयच्या प्रवेशासाठी ४१९ शासकीय आयटीआयमध्ये ९३ हजार व ५८८ अशासकीय आयटीआयमध्ये ६१ हजार अशा एकूण १ लाख ५४ हजार जागा आहेत. एक वर्ष कालावधीचे ४४ अभ्यासक्रम व दोन वर्ष कालावधीचे ३६ अभ्यासक्रम आहेत.

या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १५ मेपासून https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यात येत आहेत.शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल ९९ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी ८९ हजार ७६४ जणांनी आपला अर्ज अंतिम केला. यापैकी ८७ हजार ३१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क भरले आहे. २६ मेपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पाच दिवसांमध्ये ३५ हजार १५८ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. प्रवेश अर्ज भरल्याची मुदत संपल्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता जाहीर होईल. यानंतर विद्यार्थ्यांना हरकती नोंदविण्यास मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. जाहीर होणारी ही पहिली गुणवत्ता यादी आहे.

*शुक्रवारी सायंकाळपर्यंतची आकडेवारी*

नोंदणी झालेली – ९९,४९४

अंतिम अर्ज – ८९,७६४

शुल्क भरलेले अर्ज – ८७,३१२

पसंतीक्रम भरलेले – ३५,१५८

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button