
खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा अभियांत्रिकीला एनबीए संलग्न दर्जा प्राप्त.
खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयास एनबीए संलग्न दर्जा प्राप्त झाला आहे. एकाचवेळी ५ शाखांना एनबीएची मान्यता मिळवणारे हे महाविद्यालय कोकणातील पहिले महाविद्यालय ठरले आहे.
या मूल्यांकन महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच आजी-माजी विद्यार्थ्यांची महाविद्यालयाबाबतची भूमिका, प्राध्यापक विद्यार्थी प्रमाण, विद्यार्थ्यांचे नोकरीला लागण्याचे प्रमाण, महाविद्यालय व इतर सामाजिक शैक्षणिक संस्था सहसंबंध शैक्षणिक सोयी सुविधा याचा आढावा घेवून महाविद्यालयास हा दर्जा प्राप्त झाला आहे.यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, रजिस्ट्रार प्रा. संदीप मुन्धाटे सर्व प्रमुख, विभागप्रमुख प्राध्यापक, शिक्षकेतकर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.www.konkantoday.com