आरोग्यदूत हेच खरे देवदूत:- ना. उदय सामंत.

महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉ. श्रीकांतदादा शिंदे व उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्षप्रमुख तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक मा. मंगेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथे झालेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संवाद मेळाव्याला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली.यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी आरोग्यदूत म्हणून निस्वार्थपणे काम करणाऱ्या सर्व वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. जो माणूस सहनशील आहे, तोच वैद्यकीय क्षेत्रात काम करू शकतो.

“आरोग्यदूत हेच खरे देवदूत” असल्याचे प्रतिपादन यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केले.ज्या व्यक्तीने मुख्यमंत्री सहायता निधीचा वापर करून ७० ते ७२ हजार लोकांचे प्राण वाचवले, ज्यामुळे तीन वर्षांपूर्वी ४ कोटी रुपयांचा मुख्यमंत्री सहायता निधी पुढील अडीच वर्षांत ३५० कोटी रुपये झाला — याला जसे जबाबदार सही करणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत, तसेच त्यांच्या समोर हे प्रपोजल नेणारे मंगेश चिवटे देखील आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो.

एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहून आणि त्यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन हे लोक कार्य करत आहेत, ही आमच्यासाठी अत्यंत कौतुकास्पद व महत्त्वाची बाब असल्याचं मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं या प्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष मा. राजेशजी क्षीरसागर, माजी आमदार सुजित मंचेकर, गणेश चिवटे, मंगेश चिवटे, संदीप मोहिते यांच्यासह अनेक सन्मानीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने आरोग्यदूत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button