
रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक गद्रे मरीन, एसएनआयएक्स स्पोर्टसने घेतले रत्नागिरी जेट्सचे प्रायोजकत्व.
महाराष्ट्र – प्रीमियर लीगचे दोन वेळचे विजेते रत्नागिरी जेट्स यांनी उत्सुकता लागून राहिलेल्या आगामी सिझन ३ आधी त्यांच्या प्रतिभाशाली प्रायोजक यादीत दोन नवीन प्रायोजकांची भर घातली आहे. गद्रे मरीन हे अधिकृत प्रायोजक म्हणून तर एसएनआयएक्स स्पोट्र्स हे अधिकृत मर्चेंडाईज पार्टनर म्हणून सहभागी झाले आहेत.पुरुषांची एमपीएल स्पर्धा ४ जून २१ जून दरम्यान होणार असून, महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगला पहिला सिझन ५ जन ते १४ जूनदरम्यान होणार आहे. चितळे बिंजबार आणि पिटारा या आधीपासूनच प्रभावी ब्रँडसच्या यादीत गद्रे मरीन आणि एसएनआयएक्स स्पोर्टस यांची भर पडली आहे. हे सर्व भागीदार एकसंघ दृष्टीकोन ठेवतात.
रत्नागिरी आणि महाराष्ट्रातील तळागाळातील क्रिकेटचा स्तर उंचावणे, उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रशिक्षण व साहित्य-उपकरणे यामध्ये गुंतवणूक करून परुष आणि महिला दोन्ही एमपीएल मध्ये दोन सलग विजेतेपदांनी आमची गुणवत्ता सिद्ध केली आहे आणि आता आम्ही हीच ऊर्जा महिलांच्या संघातही घेऊन येण्यासाठी उत्सुक आहोत. आमच्या प्रायोजकांचा सातत्यपूर्ण पाठिंबा आणि त्यात नवीन सहयोगीची भर हे आमच्या प्रवासावरील विश्वासाचे प्रतीक आहे. आम्ही एकत्र मिळून रत्नागिरी जेट्सला एक अशी फ्रँचायझी बनवण्याचे स्वप्न पाहत आहोत जी केवळ मैदानावर नव्हे तर मैदानाबाहेरही प्रेरणा देईल प्रत्येक टप्प्यावर नवीन मापदंड निश्चित करेल.www.konkantoday.com