कातळशिल्पांचा ’रोडमॅप’ तयार करा, मंत्री ऍड. आशिष शेलार यांच्या सूचना.

कोकणातील अनेक ठिकाणी माळरानावर कोरीव कातळशिल्प आढळून आली आहेत. आदिमानवाने हे विविध आकार दगडात कोरलेले आहेत. हे आकार नक्की कशाचे आहेत व त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे, मात्र आता त्यांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. राज्यातील कातळशिल्प ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा, यासाठी या कातळशिल्पांसंदर्भात सर्व माहिती संकलित करून याबाबतचा एक रोडमॅप तयार करावा, अशा सूचना सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ऍड. आशिष शेलार यांनी दिले आहेत.या कातळशिल्पांना स्पॅनिश शिष्टमंडळानी भेट दिल्यानं तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला.

मंत्री शेलार म्हणाले की, आपल्याकडील कातळशिल्पांची चांगल्या प्रकारे प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर याचा संपूर्ण देशात प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे. या कातळशिल्पांवर विभागाने आंतरराष्ट्रीय दर्जाची डॉक्युमेंटरी तयार करावी. यासाठी या कातळिशल्पांचे फोटोजब तसेच व्हिडिओजब मोठ्या प्रमाणात संकलित करून ठेवावे. या छायाचित्रे आणि  व्हिडिऑना अत्याधुनिक तंत्रज्ञालाची दिले. जोड देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button