
कराड-चिपळूण वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपायोजना करा, मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना.
कराड-चिपळूण दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपायोजना करा. या मार्गात असलेली अतिक्रमणे काढून टाकण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिले. मुंबई येथून शासकीय निवास्थानाहून दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री ना. शंभूराज देसाई बोलत होते. या वेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधिक्षक तुषार दोषी, पाटणचे उपविभागीय अधिकारी सोभान टोम्पे, पोलीस उपअधिक्षक विजय पाटील, पुणे राष्ट्रीय महामार्गचे अधिक्षक अभियंता श्री. विभुते, तहसिलदार अनंत गुरव, राष्ट्रीय महामार्गच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक, यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कराड-चिपळूण महामार्गावरील राडा रोडा प्राधान्याने काढावा, अशा सूचना करुन पालकमंत्री ना. देसाई म्हणाले, या मार्गावरील वाहतूक सुरळीत व अपघात होणार नाहीत यासाठी प्राधान्याने खड्डे बुजवावेत. पावसामुळे महामार्गावर पाणी साठणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. रस्त्या शेजारी साईड पट्टया खचल्या आहेत अशा ठिकाणी त्या भरुन घ्याव्यात. हे काम येत्या आठ दिवसात करावे, असे निर्देश देऊन प्रांत, तहसिलदार व पोलीस विभागातील अधिकार्यानी कराड-चिपळूण मार्गाची पाहाणी करुन उपाययोजना सूचवाव्यात, असे निर्देश दिले आहेत.www.konkantoday.com