
अधिकार्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच भरणे-खेड-दापोली रस्त्याची दुरवस्था, गौस खतीब यांचा आरोप.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या अधिपत्याखाली येत असलेल्या भरणे-खेड-दापोली या मुख्य राज्य महामार्ग क्र. १६२ रस्त्याची आजची स्थिती दयनीय आहे. बेजबाबदार कार्यकारी अभियंता यांच्या अकार्यक्षमतेमुळेच हा मार्ग पूर्णपणे वाहतूक योग्य नसल्याचा गंभीर आरोप खेड तालुका कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी केला आहे. येत्या १ जूनपर्यंत या रस्त्याची वाहतूक व्यवस्था सुरक्षित झाली नाही तर आपण खेड तालुका कॉंग्रेसच्यावतीने भरणे-खेड-दापोली राज्य महामार्गावर मानवी साखळी उभी करून कार्यकारी अभियंता यांच्या एकूणच अकार्यक्षम कारभाराचा निषेध करण्याचा इशारा श्री. खतीब यांनी दिला.श्री. गौस खतीब यांनी माध्यमाजवळ बोलताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत अनेक बाबी उघडपणे मांडताना भरणे खेड दापोली हा रस्ता राज्य शासनाच्या राज्य महामार्ग दर्जा असणारा असल्याने सुस्थितीत तयार करण्याची जबाबदारी ही येथील कार्यकारी अभियंता यांची असताना आज या रस्त्याची स्थिती काय? २९ किलोमीटर लांबीच्या हा रस्ता एक किलो मिटर लांबीचा रस्ता सुरक्षित नाही. गतवर्षी पडलेला पाऊस त्यावेळी निर्माण झालेले खड्डे नव्याने पावसाळा सुरूवात झालेली असतानाही हे खड्डेभरले गेले नाहीत. एवढी निष्काळजीपणा कशासाठी, असा सवाल श्री. खतीब यांनी केला आहे.www.konkantoday.com