
जि.प. बांधकामच्या दुर्लक्षाने पेंडखळेतील साकव अखेर कोसळला.
राजापूर तालुक्यातील पेंडखळे येथील पेंडखळकरवाडीतील ब्राह्मणदेव मंदिराजवळील वहाळावर मोडकळीस आलेला धोकादायक साकव अखेर शनिवारच्या मुसळधार पावसात कोसळला आहे. दरम्यान याची तत्काळ दखल घेत आ. किरण सामंत यांनी या साकवाची त्वरेने दुरूस्ती करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला दिल्या आहेत. तहसिलदार विकास गंबरे यांनी देखिल या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्याकडे जि.प.च्या बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले होते.दरम्यान जि.प.बांधकाम विभागातील अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन संबं धित साकव दुरूस्त करण्याची कार्यवाही हाती घेतल्याचे सांगण्यात आले. या साकवाची पुरती दुरवस्था झाल्याने गेली तीन वर्ष व्याची दुरुस्ती करावी अशी मागणी करूनही व तसा ग्रामपंचायतीचा ठराव असतानाही त्याकडे जि.प.च्या बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले होते.www.konkantoday.com