
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय राजापूर शिबीराच्या ठिकाणात बदल.
रत्नागिरी, दि. 28 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत राजापूर येथे शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती, वाहनाची पुनर्नोंदणी व नवीन वाहनांची नोंदणीचे कामकाज शिबीर शुक्रवार 30 जून 2025 रोजी राजापूर शिक्षक प्रसारक मंडळ संचलित राजापूर हायस्कूल मैदान येथे होणार आहे. हे शिबीर शासकीय विश्रामगृह राजापूर येथे आयोजित करण्यात आले होते. परंतु, शासकीय विश्रामगृहाच्या दुरुस्तीचे कामकाज सुरु असल्याने ठिकाण बदलण्यात आले आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.*