
अन्नधान्य पिके- पौष्टिक तृणधान्य- उप अभियान(श्री अन्न) अंतर्गत नाचणी व वरई पिकांच्या प्रात्यक्षिकांसाठी 29 मे पर्यंत अर्ज करावेत.
रत्नागिरी, दि. 28 ) :-राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अन्नधान्य पिके- पौष्टिक तृणधान्य- उप अभियान(श्री अन्न) अंतर्गत नाचणी व वरई पिकांची उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्त्व विचारात घेता सुधारित वाणांच्या प्रसाराच्या दृष्टीने पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पीक प्रात्यक्षिक हे 25 एकर क्षेत्राच्या समूह प्रात्यक्षिक (क्लस्टर) धर्तीवर राबविण्यात येईल. जास्तीत जास्त शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था व बचत गट यांनी महाडिबिटी पोर्टलवर mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 29 मे 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.
अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.*कार्यक्रम 100 टक्के अनुदानावर असून शेतकरी गट/ शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे राबविला जाणार आहे. प्रात्यक्षिकामध्ये जिल्ह्यासाठी नाचणीचा 720 हेक्टर व वरई पिकाचा 40 हेक्टर चा लक्षांक प्राप्त आहे. पीक प्रात्यक्षिक अंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकरी गट 31 मार्च 2024 पूर्वी नोंदणीकृत असावा (जसे आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड). शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इत्यादींनी महाडीबिटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर निवड केली जाईल. ॲग्रीस्टॅक वर नोंदणी असणे बंधनकारक असणार आहे. महाडिबीटी पोर्टलवर नोंदणी करताना नोंदणी करणाऱ्या गटातील संबंधित व्यक्तीचा ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी वापरण्यात यावा.