
अतीवृष्टीमुळे ’एसटी’चे वेळापत्रक कोलमडले.
पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे एसटी बसेस वेळेवर येत नसून वेळापत्रकच कोलमडले आहे. त्यामुळे नोकरदार, व्यवसाय, जिल्ह्यांतर्गत दररोज प्रवास करणार्यांचे हाल होत आहेत. नोकरदार, व्यापारी, सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होऊ देऊ नका, बसेस वेळेवर सोडा, असे आदेश पालकमंत्री सामंत यांनी देऊनसुद्धा परिस्थती जैसे थेच आहे. तब्बल एक ते दीड तास एसटी बसेसची वाट पाहावी लागते. संताप वाढला आहे. आगारप्रमुख, विभाग नियंत्रकांनी आणि विशेषतः लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशीच मागणी प्रवासी करीत आहेत. एसटी महामंडळाची लाडकी लाल परी ही शहराबरोबरच ग्रामीण भागातील प्रवाशांची वरदायिनी मानली जाते. एसटी बसेसमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. सरकारतर्फे दिलेल्या सवलतीमुळे एसटीत प्रवास करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे एसटी बसेसची संख्या कमी पडत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुसज्ज असे नवीन बसस्थानक उभारले आहे. यामुळे रत्नागिरीच्या वैभवात भर पडली असली, तरी मात्र प्रवाशांच्या सेवेत मात्र गोंधळ उडत आहे. ऐन पावसाळ्यात एसटीचे वेळापत्रकच कोलमडले आहे. प्रवाशांना तब्बल एक ते दीड तास एसटीची वाट पाहावी लागत आहे. काहींना भिजतच उभे राहावे लागत आहे, पाऊस वाढल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.www.konkantoday.com