संपर्क युनिक फाउंडेशन चा अनोखा उपक्रम,50 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

रत्नागिरी…. रत्नागिरी जिल्ह्यातील संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी संस्था गेली 7 वर्षे विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करीत आहे, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची सेवा व मार्गदर्शन संस्थेच्या रुग्ण मदत केंद्र येथून गेली सात वर्षे अव्याहतपणे विनामूल्य करीत आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती साठी यावर्षी रत्नागिरी शहर व ग्रामीण भागातील इ.5 वी ते इ.10 वी च्या गरजू विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना त्यांच्या इयत्तेनुसार पुस्तके व अभ्यासक्रमाचे ॲप देण्यात आले.संपूर्ण वर्षभरासाठी हा अभ्यासक्रम असणार आहे,शिवाय त्यांना दररोज शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.एका विद्यार्थ्यांला या उपक्रमाची फी रू 15000/- आहे अशा 50 विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी च्या वतीने मोफत देण्यात आले.यासाठी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे मुंबई अध्यक्ष फिरोज कोंडकरी एन के सी एल कंपनीचे डायरेक्टर अक्षय अरोरा यांनी इ.9 वी व 10 वी चे 20 विद्यार्थी,यश नेनसी यांनी 7 विद्यार्थी,मनिष भतीजा यांनी 5 वी ते 8 वी च्या 6 विद्यार्थ्यांकरिता व इतर दानशूर व्यक्तींकडून पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक निलेश खेडेकर यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविणारे सुरू केलेले क्यूआर कोड बेस्ड व्हिडिओ व्हिज्युलायझेशन मोबाईल ॲप उपलब्ध करून दिली व सोबत पाठ्यपुस्तके दिली या उपक्रमाला एन के सी एल एज्यूटेक चे डायरेक्टर सलीम शेख यांनी पालक आणि मुले यांना या ॲप बाबत आणि अभ्यासाबाबत मौलिक मार्गदर्शन केले.

मुलांच्या पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करुन गरजू विद्यार्थ्यांना हा महाग उपक्रम मोफत दिल्याने आभार व्यक्त केले.अशाच प्रकारे विविध घटकांना त्यांच्या गरजेनुसार संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी उपक्रम हाती घेणार असून यासाठी दानशूर व्यक्तींनी संस्थेला आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शकील गवाणकर यांनी 9423292674 या मोबाईल नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button