शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष प्रणित कामगार संघटनेतील दीड हजार सदस्यांनी भाजपात प्रवेश केला


शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील 1500 सदस्यांनी एकचवेळी पक्ष सोडला आहे. या सर्व सदस्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.मुंबईत हा भव्य प्रवेश झाला.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील अनेक नगरसेवकांनी पक्षबदल केले आहेत. अशातच . शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठा झटका बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला गळती लागली असून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे.अशातच भाजपने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष प्रणित कामगार संघटनेतील दीड हजार सदस्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजप कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा मोठा हादरा मानला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button