
लोणावळ्यामध्ये गाडी वळवण्यावरून वाद झाला आणि गुहागर मधील तरुणाला स्थानिक टोळक्याने संपविले
सध्या गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून शुल्लक कारणावरून खून पडत आहेत
लोणावळा येथे फिरण्यासाठी गेलेल्या गुहागर मधील तरुणाचा वाहन वळवण्यावरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवार 25 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. कमलेश तानाजी धोपावकर (45, रा. अडुर, कोंडकारुल, गुहागर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अन्य दोनजण जखमी झाले आहेत. या खून प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची नावे समजू शकलेली नाहीत. दोघांना अटक करण्यात आली आहे.
गुहागरमधून कमलेश धोपावकर हा लोणावळा येथे एकवीरा आईचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. लोणावळा जवळील एका फार्म हाऊस जवळ गाडी वळवत असताना येथील स्थानिक तरुणाच्या टोळक्याने त्याच्याशी हुज्जत घातली. त्याचे पर्यवसान हणामारीत झाले. आणि यातूनच त्याचा खून करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी स्थानिक 2 तरुणांना ताब्यात घेतले असून अन्य 9 जण फरार आहेत.




