
मुंबई-गोवा राष्ट्रीय महमार्गावर तुरळमध्ये खासगी आराम बस-डंपरची धडक
मुंबई-गोवा राष्ट्रीय महमार्गावर तुरळ येथे खासगी आराम बस आणि डंपरची धडक बसल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. महामार्गावर रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान वाहनांच्या संगा ५ किलोमीटरपर्यंत लागल्याने वाहतूक कोंडी झाली. गणपतीपुळे येथून कोपरखैरणेकडे निघालेल्या आराम बसची तुरळ फाटा येथे डंपरला मागून धडक बसल्याने बसचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला. कडवईत जाणारा डंपर (एमएच १२ डब्ल्यू जे ४७५१) तुरळ फाटा येथून वळत असताना मागून आलेली ट्रॅव्हल बस (एमएच ४३ सीइ ४२९३) धडकल्याने बसचे मोठे नुकसान झाले. यात चालकासह बसमधील काही प्रवासी जखमी झाले. जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले अपघात झाल्यानंतर डंपर चालक पसार झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.www.konkantoday.com