
भारतात लोकशाही आहे. त्यामुळे कोणालाही कोठेही दौरा करण्याचा अधिकार आहे- उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया
भारतात लोकशाही आहे. त्यामुळे कोणालाही कोठेही दौरा करण्याचा अधिकार आहे. अर्थात आता ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रत्नागिरीत येत असले तरी येथील आमदार, खासदार यहसायुतीचेच असतील, असा ठाम दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.रविवारी रत्नागिरीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी रत्नागिरीत होत असलेल्या नवनव्या कामांचा आवर्जून उल्लेख केला. सोमवारी उद्वव ठाकरे रत्नागिरीमध्ये येणार आहेत. त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, कोणीही कोठेही दौरा करू शकतो. मात्र त्याला किती प्रतिसाद मिळतो, त्याचे मतामध्ये कितीसे रुपांतर होते, यावर त्या राजकीय पक्षाचे अस्तित्त्व अवलंबून असते. त्यांनी दौरा केला तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी – रायगडमध्ये महायुतीचाच खासदार असेल. या सर्व ठिकाणी महायुतीचेच आमदार निवडून येतील, असे ते म्हणाले.
www.konkantoday.com