
तरुणीस ब्लॅकमेलप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून चिपळुणातील तरुणाला अटक.
फेक इन्स्टाग्राम आयडी तयार करत रिलेशनमध्ये असतानाचे अश्लील फोटो मेसेजसह तिच्या होणाऱ्या पतीच्या मोबाईलवर पाठवल्याप्रकरणी तेजस पवार (३० रा. अनारी-गणेशवाडी, चिपळूण) याला येथील पोलिसांनी सोमवारी अटक केली. ही घटना एप्रिल २०२४ ते २५ मे २०२५ या कालावधीत घडली.तालुक्याच्या एका गावातील तरुणीच्या नावाचा संशयिताने फेक इस्टाग्राम आयडी तयार केला. त्यावरुन शिविगाळसह अश्लील मेसेज प्रसारीत करताना, तुला काय करायचे ते कर. आपण रिलेशनमध्ये असतानाचे तुझे फोटो व्हायरल करणार असल्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली व पीडितेच्या होणाऱ्या पतीच्या मोबाईलवर गत महिन्यात त्याने अश्लील फोटो व मेसेज पाठवले.पीडितेने याबाबत रविवारी सायंकाळी तक्रार नोंदवली. त्यानुसार रात्री उशिरा संशयित तेजस पवार या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला व सोमवारी सायंकाळी त्याला अटक करण्यात आली आहे.