
चिपळुणात शहरातील मार्कंडी परिसरात तरुणाची आत्महत्या.
चिपळूण शहरातील मार्कडी येथे ३३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परेश अनिल चतुरे (३३, मूळ-अहिल्यानगर, सध्या मार्कडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश चतुरे याने स्वतःहून त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. नेमकी, कोणत्या कारणातून त्यानेही आत्महत्या केली, याचे कारण पुढे आलेले नाही. या बाबतचा अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.www.konkantoday.com