रत्नागिरी नजिक वाटद-खंडाळा गावातील पाच एकर क्षेत्रावर भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय

रत्नागिरी नजिक वाटद-खंडाळा गावातील पाच एकर क्षेत्रावर भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रीडा राज्यमंत्री ना. आदिती तटकरे यांनी नियोजित संकुलासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी दिली.
ग्रामीण भागातील खेळाडूंनमधील क्रीडा कौशल्याला चालना मिळावी, त्यांना अत्यावश्यक सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी महाविकास आघाडीतर्फे राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुल उभारण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
मंडणगड, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यातील चार गावांमध्ये क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button