
मंडणगड मध्ये सर्कल, तलाठी व एका लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले
सरकारी खात्यात लाच घेण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे
लाच घेताना मंडणगड मध्ये सर्कल, तलाठी व एका लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. महसूल विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांना एकाच वेळी पकडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.महसूल विभागातील एका कामासाठी 45000 ची लाच मागण्यात आली होती. ही लाच घेताना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मंडणगड तहसील कार्यालय जवळ लाच लुचपत विभागाच्या पथकाने तिघांना रंगेहात पकडले. सर्कल अमित शिगवण, तलाठी श्रीरामे, कोषागार कार्यालयातील शिपाई भोसले यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे