
मिऱ्या-नागपूर महामार्गामुळे आंबाघाट हा वाहतुकीस यंदाही अपघातांना निमंत्रण देणारा ठरतोय
मिऱ्या-नागपूर महामार्गामुळे आंबाघाट हा वाहतुकीस यंदाही अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. ठिकठिकाणी साचलेला चिखल, खड्ड्यांमुळे चाळण झालेला रस्ता आणि खोदकामामुळे दरड कोसळण्याची भीती यामुळे महामार्गावरून प्रवास हा धोकादायक ठरणार आहे. मिऱ्या-नागपूर महामार्गाचे मुर्शी ते आंबाघाट रस्ता सुमारे २० किलोमीटरचा आहे. तीन वर्षांपूर्वीच अतिवृष्टीमुळे हा घाट काही ठिकाणी खचण्याचे प्रकार झाले होते. त्यावेळी हा घाट सुमारे २० दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. त्या वेळी धोकादायक ठिकाणाची डागडुजी करून हा घाट सुधारण्यात आला होता; पण आता मिर्या -नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे हा घाट पुन्हा धोकादायक झाला आहे.